सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला तीन महिन्यापेक्षाही जास्तचा कालावधी उलटला आहे. सीबीआय, ईडी आणि एनसीबी मार्फत या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा असणारा व्हिसेरा रिपोर्ट अखेर समोर आला असून त्यातून धक्कादायक खुलासा झाला आहे.
सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश असल्याचं व्हिसेरा रिपोर्टमधून समोर आलं आहे. केमिकलमुळेच सुशांतचा मृत्यू झाला का, याचा तपास होणार आहे. याबाबत ‘एबीपी माझा’ने वृत्त दिलं आहे.
एम्सच्या रेकॉर्डनूसार सुशांतच्या शरीरातील काही भागांना सीज करण्यात आलं होतं. यामध्ये सुशांतच्या पोटाचा भाग, छोट्या आतड्यांचा भाग, यकृताचा भाग, पित्ताशय, दोन्ही मूत्रपिंड, 10ML रक्त आणि टाळूचे काही केस यांचा समावेश आहे.
एम्सच्या टीमनं सुशांतच्या या सीज करण्यात आलेल्या भागांचा व्यवस्थितपणे अभ्यास केला, त्यांना या तपासात सुशांतच्या शरीरात काही केमिकल ट्रेसेस सापडले आहेत. मात्र यामुळेच सुशांतचा मृत्यू झाला का? हे अद्याप कळू शकलेलं नाही, याचं उत्तर शोधण्याचं काम सुरु आहे.
सुशांतचा पोस्टमार्टम आणि व्हिसेरा अहवाल बनविण्यासाठी एम्सच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांची विशेष टीम गठीत करण्यात आली होती.
दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्स सेवनासह इतर आरोपांखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी पूर्ण होणार आहे. न्यायालयीन कोठडी पूर्ण झाल्यानंतर रियाला पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं कळतंय.
Comment here
You must be logged in to post a comment.