मनोरंजन

सुशांत सिंहच्या कुटुंबियांची अवस्था पाहवत नाही, सुशांतच्या फॅमिली डाॅक्टरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर आहेत. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी जेव्हापासून रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे, तेव्हापासून या प्रकरणात मुंबई पोलीस, बिहार पोलीस, सीबीआय आणि ईडीने तपास सुरू केला आहे. आता सुशांतच्या फॅमिली डॉक्टरांशी यासंबंधी चर्चा केली. यावेळी डॉक्टरांनी सुशांतचं संपूर्ण कुटुंब तीव्र दुःखात असल्याचं सांगितलं आहे.

सुशांत सिंहचे फॅमिली डाॅक्टर विपीन कौशल यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. सुशांतच्या कुटुंबावर या प्रकरणाचा मोठा परिणाम झाला आहे. सुशांत फार सकारात्मक होता. तो नेहमी आपलं कुटुंब आणि भविष्याबद्दल बोलायचा. या काळात काही गोष्टी बदलल्या असतील. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी असं मलाही वाटतं. त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा.

 

याक्षणी सुशांतच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. मी सुशांतच्या वडिलांना ओळखतो. आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. बहिणी असो किंवा त्यांचे पती सर्वांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. सुशांतचे भविष्याबद्दल अनेक स्वप्न होती. तो आत्महत्या करू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा विचार केल्यावर मनात प्रश्न उपस्थित होतात, असं डॉक्टर कौशल म्हणाले.

 

मागील दिवसात रियासह तिचा भाऊ शौविक, वडील इंद्रजीत, माजी मॅनेजर श्रुती मोदीची चौकशी केली आहे. सुशांतचा हाऊस मॅनेजर, त्याचा सीए संदीप श्रीधर आणि बहिण मीतू सिंहचा जबाब सुद्धा नोंदवून घेण्यात आला आहे.

Comment here