मनोरंजन

बहिणीच्या अफेअरबाबत समजल्यावर ‘अशी’ होती सुशांतची प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूतला जाऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र अजूनही त्याचे कुटुंबीय आणि चाहते या धक्यातून सावरले नाहीत. वेगवेगळ्या गोष्टींमधून ते त्याची आठवण काढत असतात. यातच सुशांत सिंह राजपूतचे भावोजी विशाल किर्ती यांनी त्याच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

विशाल किर्तीनं ब्लॉग लिहून सांगितले की, तीन महिन्यांनंतरही त्याचं आणि त्याच्या परिवाराचं दु:खं तसंच आहे. सोबतच त्याने सुशांतच्या फॅन्सना सांगितले की, तो आता ब्लॉगच्या माध्यमातून सुशांतसोबतच्या सुंदर आठवणी शेअर करणार आहे. कारण याच्या आधारेच त्याचं आणि त्याच्या परिवाराच्या वेदना कमी होऊ शकतात.

विशालने सांगितले की, जेव्हा त्याच्या आणि श्वेताच्या अफेअरबाबत समजलं होतं तेव्हा सुशांत एका प्रोटेक्टिव भावासारखा वागू लागला होता. विशाल किर्तीने लिहिले की, ‘जेव्हा मी आणि श्वेताने कॉलेज टाइममध्ये एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं तेव्हा सुशांत एका टिपिकल प्रोटेक्टिव भावाप्रमाणे माझ्या इंटेशनवर प्रश्न उपस्थित करू लागला होता. नंतर आम्ही त्याला जाणीव करून दिली की, आम्ही दोघे या नात्याबाबत फार सीरीअस आहोत. पण तो तेव्हाच मानला जेव्हा मी यूएसमधून परतलो आणि 2007 मध्ये श्वेतासोबत लग्न केलं होतं’.

 

विशालने या ब्लॉगमध्ये व्हिडीओ चॅट दरम्यान घेतलेला सुशांत सिंह राजपूतचा फोटो शेअर केलाय आणि लिहिले की, लंडनमध्ये राहत असल्याने तो, श्वेता सिंह किर्ती नेहमीच व्हिडीओ चॅट द्वारे संवाद साधत होते.

दरम्यान, सुशांतचे चाहते, त्याचे कुटुंबीय न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. सुशांतच्या आठवणींना उजाळा देत त्याच्याविषयी अनेक गोष्टी शेअर करत आहेत. सुशांत आत्महत्येप्रकरणी अनेक यंत्रणा तपास करत आहेत. चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होत असल्यानं प्रकरणाला एक वेगळं वळण मिळत आहे.

Comment here