मनोरंजन

‘या’ व्यक्तीने दिली रिया चक्रवर्ती विरोधात साक्ष

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललंय. एनसीबी ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत आहे. एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना न्यायालयात हजर केले होते. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर सुशांचा नोकर दीपेश सावंतला अटक करण्यात आलं.

दीपेशने रिया चक्रवर्ती विरोधात साक्ष दिली आहे. चौकशी दरम्यान रियाच्या सांगण्यावरूनच घरात ड्रग्जचा वापर होत असल्याचं दीपेश म्हणाला, असं म्हटलं जात आहे. रियाच्या अटकेसाठी दीपेशची साक्षच महत्वाची मानली जाणार आहे. त्यामुळे एनसीबीने रियाला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे.

एनसीबीकडून दीपेशला सरकारी पुरावा म्हणून सादर करण्यात येणार आहे. दीपेश सावंत माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचं सुत्रांकडून समजतंय. तो या प्रकरणात जी काही माहिती देईल ती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

दीपेशला न्यायालयात हजर करण्यात आलं होते. यानंतर त्याना 9 सप्टेंबरपर्यंत रिमांडवर घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी एनसीबीच्या दक्षिण-पश्चिम विभागाचे डेप्युटी डीजी मुथा अशोक जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आधीपेक्षा यावेळी त्यांच्याकडे बरीच माहिती आहे. या प्रकरणात मीडियाने जो पाठिंबा दिला, यामुळे अधिक माहिती मिळाली. आता दोन आरोपींची रिमांड मिळाली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगल खूप मोठा होत चालला आहे. एनसीबीने पूर्ण तपास केल्यानंतर रियावर फास आवळण्यास सुरूवात केली आहे. रिया आणि अन्य लोकांमधील जे चॅट समोर आले आहे, ते पाहता रिया सतत ड्रग्ज जगताशी जोडलेली होती असे दिसते. काही अशा व्यक्ती सुद्धा समोर आल्या आहेत, ज्यांच्या संपर्कात रिया सतत होती.

Comment here