सुशांत सिंह प्रकरणानंतर चित्रपटसृष्टीची पडद्याआड लपलेली काळी बाजू हळूहळू समोर येवू लागली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशी आहे. बॉलिवूडमध्ये याचं मोठं रॅकेट असल्याचं सांगितलं जातं आहे. यातच महेश भट्ट यांच्या सुनेने लुविना लोढ हिने त्यांच्यावर आणि तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहे.
अभिनेत्री लुविना लोढनं महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवालशी लग्न केलं आहे आणि तो ड्रग्ज सप्लाय करायचा असा दावा तिनं केला आहे आणि याची माहिती महेश भट्ट यांनाही आहे, असं तिनं म्हटलं आहे. लुविना लोढ हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.
“माझं नाव लविना लोढ असून हा व्हिडीओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे. माझं लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवालसोबत झालं असून मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सुमित ड्रग्स सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत. यात अमायरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो.या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे. महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”, असं लुविना म्हणाली.
Truth as i know it. I m being harrased by Mahesh Bhatt & family. Pls support. pic.twitter.com/545IGBs35A
— Luviena Lodh (@LuvienaLodh) October 23, 2020
पुढे ती म्हणाली “आता मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे, तर ते माझ्या घरात घुसण्याचा आणि मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पोलीस ठाण्यात एनसी करायला जाते तेव्हा कुणीच माझी एनसी घेत नाही आणि एनसी घेतली तरी त्यावर कारवाई होत नाही. जर मला किंवा माझ्या कुटुंबासह काही घडलं तर त्याला महेश भट्ट, मुकेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सहगल आणि कुमकुम सहगल जबाबदार असतील. बंद दरवाजामागे हे लोक काय करतात ते लोकांना माहिती तर हवं. कारण महेश भट्ट खूप शक्तिशाली आणि प्रभावशाली आहेत”, असं ती म्हणाली.
कलाविश्वातील अनेक धक्कादायक प्रकरणांवरचा पडदा दूर होताना दिसत आहे. त्यात दिग्दर्शक महेश भट्ट हे सातत्याने चर्चेचा विषय ठरत असल्याचं दिसून येत आहे. सुशांत प्रकरणी महेश भट्ट यांच्यावर सुरुवातीपासूनच अनेक आरोप करण्यात आले होते. अशातच आता अभिनेत्री लविना लोधने हिने महेश भट्ट यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
Comment here
You must be logged in to post a comment.