मनोरंजन

बहिणीच्या नवऱ्यासोबत सुशांतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आले समोर; ‘या’ विषयांवर व्हायची चर्चा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स संबंध आढळल्यानं आतापर्यंत रिया चक्रवर्तीला, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यालादेखील अटक करण्यात आली आहे. रियाने या प्रकरणात बॉलिवूडमधील 25 जणांची नावं सांगिली आहे. त्यांचीही लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. सीबीआय, एनसीबी आणि ईडी अशा तीन यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. अशातच आता सुशांत सिंह राजपूतचे भावोजी विशाल कीर्ती यांनी सुशांतसह झालेला आपला व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.

विशाल किर्ती यांनी आपल्या ट्वीटवर या चॅटचा स्क्रिनशॉट टाकला आहे. हा स्क्रिनशॉट शेअर करताना त्यांनी पोस्टही लिहिली आहे. यामध्ये सुशांत आणि विशाल दोघंही पुस्तकांबाबत बोलताना दिसत आहे.

 

सुशांतचे भावोजी विशाल किर्ती यांनी व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. सुशांत व त्यांच्यात झालेले हे चॅट सध्या व्हायरल होतेय. हे चॅट अनेकार्थाने खास आहे. सुशांतच्या आठवणीत त्याच्या भावोजींनी हे चॅट शेअर केले आहे. मी सुशांतसोबतच्या एका बौद्धिक चॅटच्या काही सुंदर आठवणी शेअर करतोय, असे लिहित त्यांनी या चॅटचे स्क्रिनशॉट्स उघड केले आहेत.

दरम्यान, रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात भायखळा कारागृहात आहे. नारकोटिक्स ब्युरोच्या चौकशीत रियाने सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचं आणि त्यासाठीचे व्यवहार केल्याचं मान्य केलं. ती स्वतः ड्रग्ज पेडलर्सशी संपर्क करायची आणि भाऊ शौविक चक्रवर्ती आणि दिपेश सावंत यांच्यातर्फे पेडलर्सना पैसे द्यायची. एनसीबीच्या चौकशीत रियाने आणखी बर्‍याच गोष्टींची कबुली दिली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूचा शोध सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपविल्या नंतर दिशाच्या मृ.त्यूबाबत सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे. दिशा सॅलीयनच्या मृ.त्यूचा शोध सीबीआयकडं सोपविला जावा, अशीही मागणी सातत्यानं केली जात आहे. याप्रकरणी अंतिम सत्य काय समोर येतंय हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

Comment here