मनोरंजन

सुशांतची ‘हत्या नसून आत्महत्याच’, एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने उलटले असून या प्रकरणी दर दिवशी नवीन खुलासे समोर येत आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.

फॉरेन्सिक अहवालात सुशांत सिंह राजपूतची हत्या केल्याचे नाकारले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, ‘ज्या परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्यावरून असे दिसून येते की, कोणत्याही प्रकारचा यामध्ये हत्येचे कट नाही आहे आणि ही आत्महत्येची घटना आहे.’ दरम्यान एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहे.

आता सीबीआय आत्महत्येच्या अँगलने याप्रकरणाची चौकशी करणार आहे. त्यामुळे आता सुशांतने आत्महत्या केली असेल तर त्यामागचं नेमकं कारण काय? त्याला आत्महत्येस कोणी प्रवृत्त केलं? या प्रश्नांची उत्तरं या चौकशीत सापडतील. दरम्यान याप्रकरणात सीबीआयने आरोपी असलेल्या 20 हून अधिक लोकांची चौकशी केली आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय याप्रकरणी तपास करत असून आपण सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता या प्रकरणात सीबीआय काय निष्कर्ष काढते, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधून राहिले आहे.

Comment here