सुशांतला जाऊन दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. या प्रकरणी दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे होत असून त्यामुळे प्रकरणाला नवीन वळण मिळतय. त्याच्या जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र अजूनही लोक या धक्यातून बाहेर आलेले नाहीत. सुशांतचे कुटुंब, मित्र, चाहते अजूनही त्याच्या संबंधीत असलेल्या आठवणी शेअर करताना दिसतात. यातच भारतीय क्रिकेट खेळाडू सुरेश रैना याने एक फोटो शेअर करत सुशांत मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
सुरेश रैना यानं सुशांतसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. “भरपूर दु:ख आहे पण सत्य लवकरच समोर येईल. #जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत” अशा आशयाचं ट्विट करत त्यांनं आपली प्रतिक्रिया दिली. सुशांत आणि रैनाचे चाहते या पोस्टवर सतत कमेंट करत आहेत.
It still hurts my brother but I know truth will prevail #JusticeforSushantSingRajput pic.twitter.com/x7DsUiPT5P
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) August 19, 2020
या फोटोमध्ये सुशांतसिंग राजपूतचे केस लांब दिसत आहेत. तसेच त्याने रेड कॅपही घातली आहे आणि त्या दोघांच्याही चेहर्यावर एक गोड स्माइल ही दिसत आहे. सुशांतचा हा लूक त्याच्या ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाच्या दरम्यानचा दिसत आहे.
सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला परवानगी दिली होती.
हे प्रकरण सीबीआयकडे जाताच चौकशीला वेग मिळाला आहे. सीबीआयच्या पथकाने सुशांतच्या घराची रविवारी पुन्हा एकदा चौकशी केली. तर आता सोमवारी या प्रकरणासंदर्भात रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून चौकशी होणार असल्याची शक्यता आहे.
Comment here
You must be logged in to post a comment.