मनोरंजन

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; शक्ती कपूर साकारणार ‘ही’ भूमिका

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्स अॅंगलचा तपास करण्यासाठी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची चौकशी केली. श्रद्धा कपूरने एनसीबीसमोर असे मान्य केले आहे की तिने सुशांतला कधी व्हॅनिटीमध्ये तर कधी सेटवर देखील ड्रग्ज घेताना पाहिले आहे. या दरम्यान अशी माहिती मिळते आहे की, श्रद्धाचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर सुशांतवर बनत असणाऱ्या सिनेमातील एक मुख्य घटक असणार आहेत.

राहुल शर्मा आणि सरला सारागोई हे दोघं मिळून ‘सुशांत: न्याय- द जस्टिस’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटात अभिनेता जुबेर खान सुशांतची भूमिका साकारणार आहे. तर रियाच्या भूमिकेत श्रेया शुक्ला झळकणार आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार शक्ती कपूर या चित्रपटात एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत.

जुबेर ने सांगितलं की, ‘चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. मात्र, चित्रपटाची कथा आणखी मोठी होत असून आणखी पात्रं जोडली जात आहेत. यात अंकिता लोखंडे, कृती सॅनॉन, सारा अली खान, सुशांतचे कुटुंब, त्याच्या बहिणी, वकील इत्यादी. माजी व्यवस्थापक दिशा सालियन आणि श्रुती मोदी, सुशांतच्या घरात काम करणारे कर्मचारी आणि मित्र अशा पात्रांसाठी कास्टिंग जवळजवळ पूर्ण झाले आहे. चित्रपटात बिग बॉसची माजी स्पर्धक सोमी खान सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियनची भूमिका साकारणार आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर सुरू झालेला तपास आता बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनपर्यंत आला आहे. चित्रपटातदेखील या सगळ्या गोष्टींवर भाष्य केले जाणार आहे. सुशांतच्या मृत्यूसंदर्भातील सगळे अँगल यात दाखवले जातील. यात हत्येचा संशय आणि आत्महत्येच्या अॅंगलचा देखील समावेश असणार आहे. चित्रपटात पाच गाण्यांचादेखील समावेश आहे. दिलीप गुलाटी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. तर, डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याचे जुबेर खानने सांगितले.

दरम्यान एनसीबीच्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे की, शनिवारी झालेल्या चौकशीत अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने छिछोरे सिनेमावेळी केलेल्या पार्टीबाबत माहिती दिली. एनसीबीच्या चौकशीमध्ये श्रद्धा कपूरने अशी माहिती दिली आहे की छिछोरेच्या पार्टीमध्ये ती पवना फार्म हाऊसवर गेली होती तेव्हा त्या पार्टीमध्ये तिने केवळ डान्स केला होता. तिने अशी माहिती दिली की तिने यावेळी ड्रग्ज घेतले नव्हते. शनिवारी दीपिका पादुकोण आणि सारा अली खान यांची देखील दीर्घकाळ चौकशी झाली.

Comment here