मनोरंजन

सुशांतसोबत असलेल्या नात्यावर सारा अली खानचा मोठा खुलासा

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज अॅंगलचा तपास करण्यासाठी नार्कोटिक्स विभागाने जोरदार चौकशी सत्र सुरू केलं आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर आता दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानला चौकशीसाठी समन्स धाडण्यात आलं होतं. एनसीबीने केलेल्या चौकशीत साराने आपण स्वतः ड्रग्ज घेत नाही, असं स्पष्ट केलं पण सुशांतबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

‘केदारनाथ’ हा साराचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. या सिनेमातून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सुशांत आणि साराच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. त्यानंतर ते दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, साराची आई अमृता सिंह हिनं सारा सुशांतपासून दूर राहा असं बजावलं होतं. त्यामुळंच दोघांचां ब्रेकअप झाल्याचं म्हटलं गेलं. याच गोष्टीचा सारानं खुलासा केला आहे. ‘केदारनाथ’च्या शूटिंग दरम्यान सुशांतसोबत नात्यात असल्याचं सारानं कबुल केलं आहे.

सुशांतसोबत नात्यात होते परंतु कधीही ड्रग्ज घेतले नाहीत, असं सारानं एनसीबीच्या चौकशीत म्हटलं आहे. तर अनेकदा व्हॅनिटीमध्येही सुशांतला ड्रग्ज घेताना पाहिल्याचंही सारानं चौकशीत सांगितलं आहे.

दरम्यान, अंमली पदार्थ प्रकरणी सारा अली खान बरोबरच नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोन आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींचीही नावे समोर आली आहेत. एनसीबी अंमली पदार्थ प्रकरणी समोर आलेल्या सर्व अभिनेत्रींची कसून चौकशी करत आहे.

Comment here