मनोरंजन

सॅम्युअल हाओकिप सुशांतला करत होता ब्लॅकमेल, रात्री ‘इतक्या वाजता’ सोडले होते सुशांतचे घर?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीसमोरील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. रियाला ड्रग्स सेवन आणि अन्य आरोपांमुळे मंगळवारी अटक करण्यात आली. त्यानंतर तिने जामिनासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. अशातच सीबीआयच्या संशयाची सुई सुशांतचा मित्र सॅम्युअल हाओकिपकडे वळली आहे.

सॅम्युअल हाओकिप सुशांतला ब्लॅकमेल करत असल्याची माहितीसमोर येते आहे. ही गोष्ट दोघांमध्ये झालेल्या चॅटमुळेसमोर आली आहे. सुशांतच्या आयुष्यात सॅम्युअल हाओकिपची मित्र आणि कायदेशीर सल्लागार म्हणून आला. सॅम्युअल हा कायदा तज्ञ आहे. सुशांतच्या फार्महाऊसचा कॉन्ट्रॅक्ट सॅम्युअलने तयार केले होते. पण असे मानले जाते की सुशांत आणि सॅम्युअलमधील संबंध बिघडले होते.

सॅम्युअल 2019 ला रात्री दोनच्या आसपास सुशांतच्या घरातून बाहेर पडला होता. इतकंच नाही तर सुशांतने एकदा सॅम्युअलचा फोनदेखील आपल्याकडे ठेवून घेतला होता. सॅम्युअल आणि सुशांतचे अनेक चॅट्स मिळाले आहेत ज्या वरुन तो सुशांतला ब्लॅकमेल करत असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अजून सीबीआयनं मेसेजेस काय आहेत याचा खुलासा केलेला नाही.

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या मृत्यूच्या तीन दिवसांआधी स्टाफ दीपेश सावंतला त्याने फार्महाऊसचे कॉन्ट्रॅक्ट संपवण्यासाठी सांगितले होते. तिकडचे फर्नीचर विकून टाक आणि तीन कुत्र्यांना अडॉप्‍शन सेंटरमध्ये पाठव. सुशांतने हे केले कारण त्याला वाटले की फार्महाऊसच्या नावाने सॅम्युअलने त्याचा विश्वासघात केला आहे.

दरम्यान, एनसीबीच्या पथकाने सुशांतसिंह राजपूतच्या फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळी त्यांना हुक्काची भांडी, काही औषधं, अॅश- ट्रे आणि आणखी बऱ्याच गोष्टी सापडल्या. सुशांत या जागेसाठी दरमहा अडीच लाख रुपयेही देत होता. सुशांतच्या जवळच्या मित्रांव्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही तिथे पार्टी करायचा जायचे. सुशांतसिंग राजपूत जेव्हा नैराश्याशी झगडत होता तेव्हा अनेक पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं होतं.

Comment here