क्रिकेटखेळमनोरंजन

दाजी काळजी घ्या.., विराटच्या पोस्टवर सईची भन्नाट कमेंट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराटच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. त्याने आपल्या कठोर मेहनतीने मैदानावर केलेले पराक्रम कधीच विसरता येणार नाहीत. विराटने केवळ मैदानावरच नव्हे तर सोशल मीडियावरही आपले नाव गाजवले आहे. भारतीय संघाचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचं नेतृत्व करणारा विराट कोहली दुबईत दाखल झाला आहे. दुबईत आल्यानंतर विराटने आपल्या हॉटेलच्या रुमवर एक फोटो काढत चाहत्यांना आपण दुबईत पोहचल्याचं सांगितलं. त्याच्या या पोस्टवर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने कमेंट करत सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.

साहजिकचं विराटच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी त्याला यंदा ट्रॉफी जिंकूनच ये…आणि शुभेच्छांचे संदेश दिले. परंतू विराटच्या या पोस्टवर मराठी सिने-सृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने, दाजी काळजी घ्या, सेफ रहा ! अशी कमेंट केली आहे. सईच्या या अतरंगी कमेंटला नेटकऱ्यांनीही पसंती दर्शवली आहे.

भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या स्पर्धेचं आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात युएईत केलं आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी आता सर्व संघ सज्ज झाले आहेत. 20 ऑगस्टनंतर एक-एक करत सर्व संघ युएईत दाखल झाले आहेत.

आयपीएल 2020चे आयोजन दुबई, आबू धाबी आणि शारजाहमध्ये होणार असून यातील अंतिम सामना हा 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. यादरम्यान विराट आपल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकूण देण्याचा प्रयत्न करेल.

Comment here