सुशांत सिंह राजपूतला जाऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागला नाही. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. शिवाय न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशी दरम्यान या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे.
याप्रकरणी एनसीबीच्या सूत्रांनी खुलासा केला आहे की, सुशांत आणि रियाला हाय क्वॉलिटीचे ड्रग्स आवडत होते जे भारतात इंपोर्ट केले जात आहेत. या ड्रग्सची ऑर्डर रिया चक्रवर्ती देत होती मात्र ड्रग्सची डिलेव्हरी सुशांतच्या घरच्या पत्यावर होत होती.
सुशांत आणि रियाला हाय क्वॉलिटी बड्सचे सेवन करायला आवडत असल्यानं त्यांच्यासाठी हे ड्रग्स नेदरलँडमधील एम्स्टर्डम शहर, कॅनडा आणि युकेमधून येत होते. एनसीबीनुसार, या तीन देशांमध्ये जगातील सर्वात महागडे आणि उच्च दर्जाचे बड्स मिळतात. ड्रग्स माफियाच्या मागणीनुसार हे हाय क्वॉलिटी बड्सची तस्करी करून भारतात आणले जातात आणि पेडलर्सच्या माध्यमातून डिस्ट्रीब्यूट केले जातात.
तस्करी करून भारतात आणलेले हाय क्वॉलिटी बड्सची डिलिव्हरी सुशांतच्या घरी व्हायची. खास संधीवर बड्स सप्लाय करण्याचे निर्देश रिया देत होती. याशिवाय सुशांतच्या घरी हिमाचल प्रदेशवरून येणारा चरस मागवला जात होता. आता एनसीबी सुशांतकडे सप्लाय होणाऱ्या बड्सच्या फॉरेन लिंकचाही तपास करत आहे.
दरम्यान, नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोची एन्ट्री झाली आणि त्यांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. अटक सत्र सुरू झाले. दहा दिवसांच्या तपासामध्येच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो रिया चक्रवर्ती आणि ड्रग्सचं कनेक्शन स्पष्ट करून रिया चक्रवर्तीला अटक केली. मात्र, काल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा एक अधिकारी पॉझिटिव्ह आला आहे. ही टीम सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्सच्या अनुशंगाने तपास करत आहेत. आज श्रुती मोदी आणि जया शहा यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, अधिकाऱ्याची अँटीजीन रॅपिड टेस्ट पॉझिटिव आल्यामुळे श्रुती मोदीला तात्काळ घरी पाठवण्यात आलं.
Comment here
You must be logged in to post a comment.