मनोरंजन

‘सुशांतच्या मृत्यूपुर्वी रिया सुशांतला भेटली होती’; श्वेता सिंह किर्तीचा खळबळजनक दावा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता तीन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण लागण्याची शक्यता असून 13 जूनच्या रात्री रिया आणि सुशांतला एकत्र पाहिल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीनं केला आहे.

8 जूनला सुशांतचं घर सोडल्यानंतर मी पुन्हा त्याला केव्हाच भेटली नव्हती, असं रिया सीबीआय चौकशी दरम्यान सातत्यानं सांगत होती. मात्र सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जूनला रिया सुशांतला भेटली होती, असा खुलासा एका साक्षीदारानं केला आहे. सुशांतची बहिण श्वेता कीर्ती सिंहनं ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

“ही खऱ्या अर्थाने एक गेमचेंजर ब्रेकिंग न्यूज आहे. एक साक्षिदार आहे ज्याने रियाला सुशांतची भेट घेताना पाहिलंय. 13 जून रोजी नेमकं असं काय घडलं होतं? ज्यामुळे 14 तारखेला माझ्या भावाचा मृत्यू झाला.” अशा आशयाचं ट्विट श्वेताने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

रियाने आपण 8 जूनला सुशांतचं घर सोडलं. तेव्हा त्याची बहीण मीतू त्याच्यासोबत राहायला आली होती. त्यानंतर सुशांतला मी भेटलेच नाही, असं रियाने सांगितलं. मात्र आता श्वेता सिंह किर्तीच्या या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे. हा साक्षीदार म्हणजे सीबीआयच्या तपासात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

दुसरीकडे ड्रग्ज अँगलने तपास करणाऱ्या एनसीबीला रियाच्या घरातून दीड किलो ड्रग्ज जप्त केलं आहे. यामध्ये चरस आणि गांजा आहे. यामुळे आता रिया आणि तिचा भाऊ शोविकला 10 ते 20 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने दिल्याचं समजतय.

Comment here