मनोरंजन

रिया चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा, सांगितलं कुठे आणि केव्हापासून लागली सुशांतला ड्रग्सच्या नशेची सवय

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुख्य आरोपी मानलेल्या रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक करण्यात आली. सध्या एनसीबी या प्रकरणी ड्रग्स अॅंगलवर तपासणी करत आहे. यामुळे झगमगत्या दुनियेमागील काळ वास्तव समोर येत आहे. याप्रकरणी अनेकांची नावे देखील समोर आली आहेत. ड्रग्ज स्कँडलमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत. या लोकांचा सुशांतशी कसा संबंध आला याचाही रियाने खुलासा केला.

रियाने दावा केला की सुशांतला एका फिल्ममेकअरने ड्रग्जचं व्यसन लावलं होतं. तो सुशांतला ज्या पार्ट्यांमध्ये कोकेन, एलएसडी आणि गांजा मिळेल अशा पार्टीत घेऊन जायचा. सीएनएन न्यूज 18 च्या वृत्तानुसार सुशांतने रिया चक्रवर्तीला त्यांच्या रिलेशनशिप दरम्यान या सर्व गोष्टी सांगितल्याचं ती म्हणाली.

रिया असंही म्हणाली आहे की, सुशांतच्या लोणावळयातील पार्टीला ती कधीही गेली नाही. तिथे हजर कलाकारांना ड्रग्स दिले जायचे. ड्रग्स संबधित रियाने 25 नावे घेतली आहेत त्यात सारा अली खान आणि रकुल प्रीतसारख्या मोठ्या कलाकारांचे नाव आहे. सुशांतच्या लोणावळा फार्महाऊस फक्त बॉलिवूडकरांच्या ड्रग्ज पार्ट्या व्हायच्या असंही तिने चौकशीत मान्य केलं.

रियाने 20 पानांचा कबुलीजबाब एनसीबीसमोर दिला आहे. या कबुलीजबाबात काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. ज्याच्याआधारे एनसीबी पुढील तपास करत आहे. एनसीबीने तब्बल 7 ठिकाणी धाडी घातल्या असून त्यात ड्रग्जचा मोठा साठाही हाती लागल्याची माहिती मिळते आहे.

Comment here