मनोरंजन

सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं ‘हे’ काम, एनसीबीचा मोठा खुलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआय करते आहे. सुशांतचा मृत्यू आत्महत्या की हत्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही. रिया चक्रवर्तीने आणि सुशांतच्या कुटुंबीयांना तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांची आणि रिया दोघांची चौकशी होणार. सध्या रिया ड्रग्स प्रकरणात जेलमध्ये आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप लावला आहे.

नारर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या जामिनाचा विरोध करत दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटले की, हे ड्रग सिंडिकेटचे सक्रिय सदस्य आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून दाखल उत्तरात म्हटले गेले आहे की, याबाबत ठोस पुरावे आहेत कि रियाने ड्रग तस्करीला वित्त पुरवठा केला. व्हाट्सऍप चॅट, मोबाइल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्कमधून मिळालेले रेकॉर्ड सांगतात की, रिया चक्रवर्ती सतत याचा करार करत होती, तसेच बेकादेशीरपणे या व्यापारात वित्त पुरवठाही करत होती.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती अंमली पदार्थ प्रकरणी एक सक्रीय सदस्य होती. रिया बरोबरच हाय सोसायटीतील अनेक लोक ड्रग्जचं सेवन आणि व्यापार करत आहेत. तसेच रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला अंमली पदार्थांच सेवन करण्यासाठी प्रोत्साहित करत होती, असा आरोप एनसीबीनं रियावर केला आहे.

संपूर्ण घटना पाहता सुशांत ड्रग्जचं सेवन करतो हे रिया चक्रवर्तीला माहित होतं. मात्र, रिया सुशांतला ड्रग्जचं सेवन करण्यासाठी फक्त प्रोत्साहित करत होती. रियानं सुशांतला ड्रग्ज घेण्यापासून केव्हाच रोखलं नाही. रियानं याप्रकरणी षडयंत्र आखत सुशांत पासून अंमली पदार्थांविषयी काही गोष्टी लपवून ठेवल्या होत्या, असा आरोप एनसीबीनं रियावर केला आहे.

दरम्यान, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एम्स रूग्णालयाने सीबीआयकडे फेरतपासणीचा अहवाल सोपवला होता. यामध्ये सुशांत राजपूतच्या मृत्यूवेळी त्याच्या शरीरात विषाचे अंश सापडले नसल्याचं या अहवालातून स्पष्ट झालंय. एम्सच्या अहवालामुळे सीबीआयला आता सुशांतने आत्महत्याच केली होती हे गृहित धरून त्यास कोण कारणीभूत आहे याअनुषंगानेच तपास करावा लागेल

Comment here