मनोरंजन

एनसीबी चौकशीत रियाला अश्रू अनावर, ‘या’ गोष्टींचा केला खुलासा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगल खूप मोठा होत चालला आहे. एनसीबीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीला रिमांडमध्ये अगोदरच घेतले आहे. रिया चक्रवर्तीच्या घरी रविवारी सकाळी पुन्हा एकदा नार्कोटिक्स विभागाची टीम दाखल झाली. यावेळी समन्स घेऊन टीम रियाच्या घरी पोहोचली. आता रियावर सुद्धा अटकेची टांगती तलवार लटकत आहे.

रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यात आली तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. रडत रडतच तिनं अनेक गोष्टींचा खुलासा केला. एनसीबीनं केलेल्या चौकशी दरम्यान रियानं आपण ड्रग्स मागवले असल्याची कबुली दिली आहे. या चौकशीत रिया आणि तिचा भाऊ शौविक या दोघांची समोरसमोर बसून चौकशी केली. यावेळी रियाला रडू फुटले. त्यानंतर रियाची स्वतंत्र्य चौकशी करण्यात आली होती. यात रियाला 60 ते 70 प्रश्न विचारण्यात आले. पण रियाने फक्त 15 प्रश्नांची उत्तरं दिली. रियाने मान्य केले की, मार्च आणि एप्रिल 2020 मध्ये दिपेशकडून ड्रग्स मागवले होते. परंतु, आपण ड्रग्स घेतले नसल्याचे रियाने स्पष्ट केले.

त्याचबरोबर सॅम्युअल मिरांडा आणि रियाची समोरासमोर चौकशी केली. यावेळीही रियाला तू ड्रग्स घेतले का? असे प्रश्न विचारले होते. पण, रियाने पुन्हा एकदा आपण ड्रग्स घेत नाही परंतु, आपण सिगारेट ओढत असल्याचे सांगितले. रियाने हे ही कबुल केले की, ड्रग्स डिलर बासिद परिहारशी पाच वेळा भेटली होती. त्याची भेटही सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी झाली होती. सुशांत नैराश्यग्रस्त झाला होता. त्याचा अलीकडेच एक सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यानच सुशांत ड्रग्स घेत होता, अशी माहितीही रियाने दिली.

सुशांतप्रकरणी अंमली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून या प्रकरणानं एक वेगळं वळण घेतलं आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणात अतिशय वेगानं तपास करत आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती याप्रकरणी सुरुवातीपासूनच वादाच्या घेऱ्यात सापडली आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि चक्रवर्ती कुटुंबाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा विरोधात पुरावे सापडल्यानं एनसीबीनं शौविक आणि सॅम्युअलला ताब्यात घेतलं आहे.

Comment here