अभिनेत्री राधिका आपटे आपल्या बोल्ड भूमिकेविषयी प्रसिद्ध आहे. हिंदी-मराठी चित्रपटांसह नेटफ्लिक्सवर गाजणाऱ्या राधिका आपटेचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तिनं आपल्या लग्नाविषयी खुलासा केला आहे.
अभिनेत्री राधिका आपटेने 2012मध्ये लंडनमधील प्रसिद्ध संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे. राधिकाला अनेकवेळा तिने हे लॉन्ग डिस्टेंस लग्न का केले असा प्रश्न विचारण्यात आला ? अखेर याचं खरं कारण तिने सांगितलं.
अभिनेता विक्रांत मेस्सीच्या इन्स्टाग्रामवर राधिका व विक्रांतचा प्रश्न उत्तरांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या मुलाखतीदरम्यान विक्रांतने राधिकाला तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, व्हिसा मिळणं हे अवघड आहे. मात्र लग्न केल्यामुळे व्हिसा मिळणं सोपं होतं. त्यामुळे मी लग्न केलं. अन्यथा लग्नसंस्थेवर माझा विश्वास नाही. आम्हाला दोघांना एकत्र राहायचं होतं. त्यामुळे व्हिसा मिळणं आवश्यक होतं आणि व्हिसासाठी लग्न करणं गरजेचं होतं, असं ती सांगते.
दरम्यान, राधिकाच्या आगामी प्रोजेक्टबाबत बोयचे झाले तर, तिने आजवर मराठी, बंगाली, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतील सिनेमा, वेबसीरिज आणि लघुपटात काम केल्यानंतर आता ती हॉलिवूड सिनेमातही झळकणार आहे. या सिनेमाची घोषणा खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर केली आहे. या सिनेमाचे नाव आहे ‘अ कॉल टू स्पाय’. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ कॉल टू स्पाय सिनेमा आयएफसी फिल्मने घेतला आहे.
राधिकाने 2012 मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. सध्या ती लंडनला असते. या वर्षी ब्रेक घेतल्याने काम करीत नसल्याचे तिने या मुलाखतीत सांगितले. राधिका यापूर्वी नेटफ्लिक्सवर लस्ट स्टोरीज, गूल, सेक्रेड गेम्स, अंधाधून अशा अनेक प्रकल्पांमध्ये दिसली आहे.
Comment here
You must be logged in to post a comment.