मनोरंजन

‘सुशांतला खरंच न्याय मिळेल का?’; सुशांतच्या मेहुण्यानं उपस्थित केला प्रश्न

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला तीन महिन्यांहून जास्त कालावधी लोटला आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय याप्रकरणी तपास करत आहे. मात्र, अद्याप सुशांतची हत्या करण्यात आली होती की सुशांतनं आत्महत्या केली होती, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. अशातच सुशांतच्या मेहुण्यानं एक प्रश्न उपस्थित केला आहे.

श्वेता सिंह किर्तीच्या पतीने एक पोस्ट शेअर करत सुशांतला न्याय मिळेल का असा प्रश्न विचारला आहे. सोबतच त्यांनी सुशांतचा एक जुना फोटोदेखील शेअर केला आहे. “आपण अंतिम रेषेपर्यंत पोहोचलो आहोत? सुशांतला खरंच न्याय मिळेल का? सुशांतचा निरागस चेहरा दिवसाच नाही तर रात्रीदेखील आमच्या स्वप्नांमध्येही राज्य करु लागला आहे”, अशी पोस्ट विशाल किर्ती यांनी शेअर केली आहे.

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी रिया आणि सुशांतची भेट झाली होती, हे सांगणारा साक्षीदार सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने हा मोठा खुलासा केला आहे.

रियाने आपण 8 जूनला सुशांतचं घर सोडलं. तेव्हा त्याची बहीण मीतू त्याच्यासोबत राहायला आली होती. त्यानंतर सुशांतला मी भेटलेच नाही, असं रियाने सांगितलं. मात्र आता श्वेता सिंह किर्तीच्या या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे. हा साक्षीदार म्हणजे सीबीआयच्या तपासात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

Comment here