ट्रेंडिंगमनोरंजन

‘सडक 2’ चित्रपटाच्या ट्रेलरला नापसंती पाहून पूजा भट्टनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर घराणेशाही वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे बाॅलिवूडमधील मोठ्या लोकांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशातच बुधवारी सडक 2  चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी ट्रेलरला नापसंती दाखवली आहे. यातच पूजा भट्टनं यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय दत्त, पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला महेश भट्ट यांच्या ‘सडक 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित होताच यूट्यूबवर 24 तासात सर्वाधिक नापसंत केलेला ट्रेलर ठरला.

 

एका ट्वीटर युझरने पूजा भट्टला टॅग करून यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ट्विटर युझरने म्हटलं, “पूजा भट्ट हेटर्सबाबत चिंता करू नकोस. लाखो डिसलाइक्स मिळाल्यानंतरही सडक 2 पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे. फिल्मसाठी शुभेच्छा” या युझरच्या पोस्टवर पूजाने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रेम करणारे आणि राग करणारे लोकं हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही दोघांनीही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि चित्रपट टॉप ट्रेंडमध्ये असल्याची खात्री करुन दिली त्याबद्दल तुमचे आभार’ असे पूजा भट्टने ट्विटमध्ये म्हटले आहे.

ट्रेलर रिलिज झाल्यानंतर सिनेमा न पाहण्याची भाषा पुन्हा एकदा सोशल मीडियावर केली जात आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबाबत सोशल मीडियावर चर्चा केली जात आहे. सडक 2 हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रत्येक भूमिकांची ओळख करण्यात आली असून कथेची झलक पाहायला मिळते.

Comment here