मनोरंजन

‘आम्ही खरे होतो’ सुशांत प्रकरणावर मुंबई पोलिसांचं मोठं विधान

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह चौकशीत एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सीबीआयला आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात त्यांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावत, त्याने आत्महत्या केल्याचे म्हटलंय. हा रिपोर्ट सुशांत प्रकरणात महत्त्वपूर्ण पुरावा ठरला असून यामुळे अनेक बाबी स्पष्ट होऊ शकतात.

एम्स रुग्णालयाच्या अहवालाबाबत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘आमच्याकडे एम्स रुग्णालयाकडून अद्याप याबाबत कोणताही अधिकृत अहवाल आलेला नाही. मात्र, वृत्त वाहिन्यांना या अहवालाची माहिती झाली आहे. या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी आपल्या तपासात ज्या बाबी आढळल्या होत्या त्याच इथेही आढळून आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांचा आणि कूपर रुग्णालयाचा तपास योग्य होता. या तपासावरुन आमच्यावर खूप आरोप झाले. मात्र, एम्सच्या अहवालानं हे सिद्ध केलं की आम्ही खरे आहोत.’ असं परमबीर सिंग म्हणाले.

या प्रकरणात सीबीआयला वैद्यकीयदृष्टीने मदत करण्यासाठीच एम्स रुग्णालयातील तज्ज्ञांचे हे पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने सीबीआयला आपला अंतिम अहवाल सादर करताना ही आत्महत्येचीच केस असल्याचे शिक्‍कामोर्तब केले आहे. त्याच्या पोटात विषाचा अंश सापडलेला नाही असे या आधीच्या अहवालात नमूद करण्यात आले होते.सीबीआय आता सुशांत सिंह याला आत्महत्या करण्यास कोणी भाग पाडले याविषयी आपले तपास कार्य केंद्रित करणार असल्याचं समजतय.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी मृतअवस्थेत आढळला होता. त्यानंतर कुटुंबियांनी ही हत्या असल्याचा आरोप करत पटना पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. मुंबई-पटना पोलिसांच्या वादानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले. मात्र आता हे प्रकरण नेमके काय वळण घेणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

Comment here