अयोध्येत करोनामुळे गर्दी कमी असली तरी देशभरात भक्ती सागराला उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. राम मंदिराच्या मंदिर उभारणीच्या कामाला खऱ्या अर्थानं सुरूवात होत आहे. यातच भाजपाचे नेते आणि गायक मनोज तिवारी यांनी राम जन्मभूमी सोहळ्यावर गाणं तयार केलं आहे.
भाजपाचे दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि अभिनेते मनोज तिवारी यांनी एक स्पेशल गाण लिहिलं आहे. मंगळवारी रात्री तयार करण्यात आलेलं गाण रिलीजही करण्यात आलं आहे. भक्तरसात न्हाऊ घालणाऱ्या या गाण्याचे बोल ‘जहॉ जगत में राम पधारे, उसी अयोध्या जाना है’ असे आहेत. हे गाणं त्यांनी एका रात्रीत तयार केलं आहे.
#JaiShriRam
आयोध्या भूमिपूजन स्पेशल गीत | Jaha Jagat Me Ram Padhare | Manoj Tiwari “… https://t.co/noyXZxMpPH via @YouTube— Manoj Tiwari (@ManojTiwariMP) August 5, 2020
या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे मोजक्याच लोकांना आमंत्रणं देण्यात आली आहे.
त्यामुळे मनोज तिवारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांनी या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रभूरामचंद्रांचं आणि अयोध्येचं वर्णन करणार सुंदर गीत यानिमित्तानं लिहिलं आहे.
Comment here
You must be logged in to post a comment.