अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत आहे. अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे आपला आनंद व्यक्त करत आहे. यातच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला.
लता मंगेशकर यांनी ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘नमस्कार. अनेक राजांचं, अनेक पिढ्यांचं आणि संपूर्ण विश्वातील राम भक्तांचं अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचं पुनर्निर्माण होत आहे, शीलान्यास होत आहे. मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय माननीय लालकृष्ण आडवाणींचं आहे. कारण त्यांनी या मुद्द्यावरून रथयात्रा सुरू करून संपूर्ण भारतात जनजागृती केली होती आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा श्रेय आहे. आज भूमिपूजनाचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राम जन्मभूमी न्यास अध्यक्ष नृत्य गोपाल दासजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या भूमिपूजनाला उपस्थित राहतील. आज करोनामुळे लाखो रामभक्त तिथे पोहोचू शकले नसले तरी त्यांचं मन श्रीराम यांच्या चरणीच लीन असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचा मला खूप आनंद आहे. आज मी, माझं कुटुंब आणि संपूर्ण विश्व खूप खूश आहे. जणू प्रत्येक श्वास आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून जय श्री राम हा उच्चार होत आहे.’
नमस्कार.कई राजाओं का ,कई पीढ़ियों का और समस्त विश्वके राम भक्तोंका सदियों से अधूरा सपना आज साकार होता दिख (cont) https://t.co/9vYy3nRylh
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 5, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामनामाच्या गजरात भूमिपूजनचा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान, देशभरातील नागरिकांनी आहे तिथूनच हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे.
Comment here
You must be logged in to post a comment.