मनोरंजन

‘प्रत्येकाला सत्य हवंय पण…’; सुशांत सिंहच्या मृत्यूवर हृतिक रोशनच्या आईची पोस्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अंमली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. यातच सुशांतच्या मृत्यू प्रकरणावर अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

भरपूर कालावधीनंतर पिंकी रोशन यांनी इन्स्टाग्रामवर सुशांतच्या फोटोसोबत एक पोस्ट लिहिली आहे. ‘प्रत्येकाला सत्य हवंय पण कुणालाही प्रामाणिक राहायचं नाहीये’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली. सोबतच सुशांतचा फोटोसुद्धा त्यांनी पोस्ट केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

#prayersarepowerful #universeispowerful🌍

A post shared by Pinkie Roshan (@pinkieroshan) on

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला चार महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला. सुशांतची हत्या नसून त्याने आत्महत्या केलीये, हे एम्सच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही अभिनेत्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना सीबीआय रिपोर्टची प्रतीक्षा आहे. तूर्तास सुशांतच्या मृत्यूप्रकरणावर अभिनेता हृतिक रोशन याची आई पिंकी रोशन यांनी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहेत.

सीबीआयने आत्तापर्यंत अनेकांची चौकशी केली. मात्र अद्यापही सीबीआयला कुठल्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता आले नाही. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अनेकांना अटक केली आहे. मात्र सीबीआय तपासाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Comment here