आरोग्यलाईफस्टाईल

बडीशेप खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

आपण बरेच जण जेवण झाले की, बडीशेप खात असतो. अनेक पदार्थामध्ये स्वादासाठी वापरली जाणारी बडीशेप जेवणानंतर खाण्याची पद्धत आहे. बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्रेशियम, खनिज, व्हिटॅमिन सोबतच पोषक तत्वे आहेत. याचा उपयोग चांगल्या आरोग्यासाठी होतो. बडीशेपमध्ये असे अनेक गुण आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे – 

1. जेवल्यानंतर बडीशेप खाल्ली तर जेवण चांगलं पचतं.

2. दररोज बडीशेप खाल्ल्यास डोळ्यांची दृष्टी चांगली होते. दररोज 4-5 ग्रॅम बडीशेप खाण्याने डोळे निरोगी व तजेलदार राहतात.

3. बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे शरीरासाठी आवश्यक असतं. हे रक्तवाहिन्यांना लवचिक बनवतं.

4. तुम्हाला सारखी लघवी लागत असेल तर तिच्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. याबरोबरच शरीरातील अनावश्यक विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे लघवीशी संबंधित तक्रारी दूर होतात.

5. शरीरातील हॉर्मोन्सची पातळी चांगली ठेवण्यासाठी तसेच त्वचा थंड ठेवण्यासाठी झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियम हे बडीशेपमधील घटक परिणामकारक असतात.

6. मासिकपाळीच्या दिवसात पोटात जास्त दुखत असेल तर महिलांनी साखरेसोबत बडिशेप खावी.पोटदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

7. जुलाब होणे, वारंवार पोटात दुखणे, किंवा शैचास साफ न होणे यासाठी बडीशेप, खसखस, धने, जिरे, सुंठ ही पाण्यात उकळवून गाळून ते पाणी सकाळ-संध्याकाळ घ्यावे. यामुळे लगेच फरक दिसून येतो.

8. बडीशेप खाण्याने तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते. वजन कमी करण्यासाठी कपभर पाण्यात एक चमचाभर  बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या.

9. रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप आणि साखर बारीक करून कोमट पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळे बद्धकोष्ट आणि गॅसच्या त्रासापासून आराम मिळतो.

10. उलटीचा त्रास होत असेल तर बडीशोप खावी. तात्काळ आराम मिळतो.

Comment here