मनोरंजन

‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोमध्ये बिग बींनी पहिल्याच स्पर्धकाला विचारला सुशांतविषयी ‘हा’ प्रश्न

‘कौन बनेगा करोडपती’च्या 12 व्या सीझनची तयारी आता पूर्ण झाली आहे. या शो कडे तमाम भारतीयांचं लक्ष आहे. लॉकडाऊनमुळे हा शो सुरू व्हायला वेळ लागला. पण आता पूर्ण ताकदीनिशी या शोचं चित्रीकरण सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाला मोठा सेटबॅक बसला. होता होता होणारी कामं रखडली. आर्थिक मिळकत थांबल्यावर प्रत्येकजण जवळपास सहा महिने मागे गेला. हाच सेटबॅक लक्षात घेऊन कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सीझनची टॅगलाईन आता ‘जो भी हो सेटबॅक का जवाब कमबॅक से देंगे’ अशी आहे. या शोमध्ये पहिल्याच स्पर्धकाला अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी प्रश्न विचारण्यात आला.

यंदाच्या सिझनमध्ये प्रेक्षकांना सहभागी होता आलं नाही. त्यामुळे ‘ऑडियन्स पोल’ हा लाइफलाइन बदलून आता ‘व्हिडीओ अ फ्रेंड’ असा लाइफलाइन ठेवण्यात आला आहे. आरती जगताप या केबीसीच्या पहिल्या स्पर्धक होत्या. या शोमध्ये पहिल्याच स्पर्धकाला अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी प्रश्न विचारण्यात आला.

सुशांतच्या मृत्यूनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुशांतसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव काय असा प्रश्न आरती यांना विचारण्यात आला होता. सुशांतच्या शेवटच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटातील सहकलाकार संजना सांघीबद्दल हा प्रश्न होता. आरती यांनी कोणतीही लाइफलाइन न वापरता या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं. या शोमध्ये त्यांनी 6.40 लाखांची रक्कम जिंकली.

दरम्यान, चित्रिकरणापूर्वीच या सेटवर दोन कोरोना पॉझिटिव्ह क्रू मेम्बर्स सापडल्याने थोडी खळबळ उडाली होती. परंतु, इथे काम करणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत आहे. कौन बनेगा करोडपतीच्या 12 सीझनची चाहूल लॉकडाऊन काळातच लागली होती. याच काळात अमिताभ बच्चन यांनी आपल्या घरातून कौन बनेगा करोडपतीचे प्रोमो शूट करून दिले होते. त्यावरून त्यांच्यावर मोठी टीकाही झाली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करुन काम आलं की काम करायला हवं असं सांगत बच्चन यांनी हे प्रोमो करून दिले होते.

Comment here