मनोरंजन

रिया चक्रवर्ती विरोधात ईडीला सापडला नाही पुरावा; लवकरच मिळणार दिलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक रहस्य समोर येत आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआई, ईडी, एनसीबी या तीन केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे. एम्सच्या पथकाने अतिशय महत्वाची माहित दिली आहे. सुशांत सिंह राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. अशातच आता अजून नवीन माहिती समोर येत आहे.

सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्ती वर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत तक्रार दाखल केलाी होती. मात्र आता रियाने आर्थिक संपत्ती लुबाडल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे ईडीच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. सुशांतच्या खात्यावरून रिया व तिच्या कुटुंबीयांशी व्यवहार झाला नसल्याने त्यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालवू शकत नाही, या निर्णयावर अधिकारी पोहचले आहेत.

सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया, तिचे कुटुंबीय आणि सुशांतचे सीए व मॅनेजर यांनी कारस्थान करून त्याचे 15 कोटी हडप केल्याची तक्रार पटना पोलिसांकडे दिली होती. हा तपास सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर ईडीनेही जुलैअखेरीस त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

सुरुवातीला सीए श्रुती मोदी, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि त्यानंतर शोविक, रिया व तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. सुशांतसह या सर्वांचे बँक अकाउंट, कॅश, डेबिट कार्ड, आॅनलाइन बँकिंग आदी सर्व व्यवहार, त्यांचा गेल्या तीन वर्षांतील आयकर परतावा तपासला.

सुशांत, रियाच्या युरोप ट्रिप व काही शॉपिंगचा खर्च सुशांतच्या खात्यावरून झाला आहे. मात्र ही रक्कम फार मोठी नाही. सुशांत व रिया ‘लिव्ह इन’मध्ये राहत असल्याने तो आक्षेपार्ह म्हणता येत नसल्याचे ईडीचे मत आहे.

दरम्यान, सीबीआयचं विशेष पथक सर्व बाजूने तपास करत आहे. एम्सच्या रिपोर्टशिवाय सीबीआय सीएफएसएल आणि एफएसएल रिपोर्ट्सचाही समावेश आहे. हे तिन्ही रिपोर्ट सुशांतच्या आत्महत्येचे संकेत देत आहे. शिवाय सीबीआय आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या अँगलनेही तपास करत आहे.

Comment here