मनोरंजन

रिया चक्रवर्तीला त्रास देऊ नये तिची सुटका करा, ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक रहस्य समोर येत आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआई, ईडी, एनसीबी या तीन केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे. रिया चक्रवर्तीला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. रिया ही सुशांतला ड्रग्ज पुरवित होती असं आढळून आल्याने कारवाई करत तिला आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली होती. अशातच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी रियाला सोडण्याची मागणी केली.

रिया चक्रवर्तीला आता त्रास देऊ नये तिची तातडीने सुटका करावी अशी मागणी लोकसभेतले कांग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. एम्सने हत्येची शक्यता फेटाळून लावत सुशांतने आत्महत्याच केली असं जाहीर केल्यानंतर तिची सुटका करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘सत्य कोणत्याही परिस्थितीमध्ये बदललं जाऊ शकत नाही. रिया चक्रवर्तीच्या वतीने आम्ही कायम सांगत आलोय. पण काही माध्यमांमध्ये रियाबाबतच्या बातम्या विशिष्ट हेतूने पेरल्या जात आहेत. मात्र, आमचा सत्यावर विश्वास आहे. सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया , रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.

एम्सच्या पथकाने अतिशय महत्वाची माहित दिली आहे. सुशांत सिंह राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.

Comment here