मनोरंजन

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयनं केलं ‘हे’ मोठं विधान

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. मात्र या चौकशीबाबात सीबीआयकडून कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या वतीने आता पहिल्यांदाच माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे.

‘सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या संबंधात सीबीआय व्यावसायिकरीतीने तपास करत आहे. यात सर्व पैलूंचा विचार करण्यात येत असून, कुठलाही पैलू अद्याप नाकारण्यात आलेला नाही,’ असे सीबीआयच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सांगितले.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयला अद्याप खुनाचा पुरावा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत सीबीआय आता सुशांतने आत्महत्या केली असावी या बाजूने चौकशी करीत आहे. अशा परिस्थितीत सुशांतला आत्महत्येस कोणी प्रवृत्त केले याची आता सीबीआय चौकशी करेल.

दरम्यान, सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंग यांनी, सुशांत मृत्यूप्रकरणाचा तपास अचानक मंदावला असून सर्व लक्ष अमली पदार्थ प्रकरणाकडे वळवण्यात आले आहे. यावेळी त्यांनी सीबीआयतर्फे या प्रकरणाचा तपास सुरु असताना एकदाही पत्रकारपरिषद घेण्यात न आल्याची खंत बोलून दाखवत हे धक्कादायक असल्याचं म्हंटल होत.

Comment here