मनोरंजन

सुशांत सिंह प्रकरणाला 302 कलम लावण्याचा सीबीआयचा विचार, सिद्धार्थ पिठानीची घेणार अंतिम साक्ष

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलने तपास करताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक केली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने उलटून गेले आहेत. तरीही अद्याप सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी सिद्धार्थ पिठानी हा सुशांत मृत्यू प्रकरणातील अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे.

या प्रकरणातील सिद्धार्थ पिठानी हा अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे. कारण, तो सुशांतचा मित्र होता. तो त्याच्यासोबत राहत होता. सुशांतचा मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी सिद्धार्थ वांद्रेमधील त्याच फ्लॅटवर होता. मात्र सिद्धार्थ सातत्याने आपले जबाब बदलताना दिसतो आहे. सीबीआय सिद्धार्थ पिठानीचा अंतिम जबाब 4 ऑक्टोबरला घ्यायचे ठरविले असल्याचे समजते आहे.

गेल्या काही दिवसांपासून सीबीआय इतरांचे जबाब घेत असताना सिद्धार्थ पिठानी मात्र गायब झाला होता. आधी वेगवेगळ्या माध्यमातून रियाची पाठराखण करणारा सिद्धार्थ अचानक बोलायचा बंद झाला. तो मुंबईत नसल्याच्या बातम्याही आल्या. पण आता आलेल्या माहीतीनुसार, सिद्धार्थ दिल्लीत पोहोचला आहे. सीबीआयची टीम, जी सुशांत मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्लीत आली होती तीही आता दिल्लीत पोचली आहे. आता दिल्लीत सिद्धार्थ पिठानीची साक्ष होणार आहे.

सुशांत प्रकरणी सिद्धार्थ महत्वाचा साक्षीदार आहे मात्र सिद्धार्थ आपले जबाब वारंवार बदलतोय हे सीबीआयच्या लक्षात आल्यानं कलम 164 नुसार 4 ऑक्टोबरला सिद्धार्थची साक्ष घेतली जाणार आहे. 4 ऑक्टोबरला सिद्धार्थनं दिलेली साक्ष हि अंतिम साक्ष मानण्यात येणार आहे. काही साक्षीदारांच्या उपस्थितीत सिद्धार्थची साक्ष लिहून घेतली जाणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सीबीआय सुशांत प्रकरणी तपास करत आहे. सुशांत प्रकरणात आत्तापर्यंत समोर आलेले पुरावे पाहता सीबीआय सुशांत प्रकरणी कलम 302 लावण्याचा विचार करत आहे. सुशांत प्रकरणी कलम 302 लागल्यानंतर सुशांत प्रकरणातील गुन्हेगारांना 302 कलमांतर्गत येणारी शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी रिया आणि सुशांतची भेट झाली होती, हे सांगणारा साक्षीदार सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने हा मोठा खुलासा केला आहे. रियाने आपण 8 जूनला सुशांतचं घर सोडलं. तेव्हा त्याची बहीण मीतू त्याच्यासोबत राहायला आली होती. त्यानंतर सुशांतला मी भेटलेच नाही, असं रियाने सांगितलं. मात्र आता श्वेता सिंह किर्तीच्या या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे. हा साक्षीदार म्हणजे सीबीआयच्या तपासात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

Comment here