आलं मसाल्यामधील महत्वाचा घटक आहे. आयुर्वेदातदेखील आल्याला खूप गुणकारी मानले जाते. कारण यामुळे शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळते. बायोएक्टिव घटकांनी आणि पोषक तत्वांनी संपूर्ण असलेले आले हे माणसाच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी लाभदायक असतं. आल्याचे अनेक आरेग्यदायी फायदे आहेत.
आल्याचे आरोग्यादायी फायदे –
1. आलं सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे. अतिसारावर आल्याच्या रसाचा बेंबीवर लेप करावा. आल्याचा रस व मध सम प्रमाणात बाटलीमध्ये साठवून दोन-दोन चमचे दोन वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे व स्वरभंग बरे होतात.
2. आलं कॉलेस्ट्रॉलला कंट्रोल करते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. यामुळे रक्ताच्या गाठी होत नाहीत. तसेच कॅन्सरच्या लक्षणांवर मात करते.
3. आल्याचे सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही. पोटदुखी व मळमळ थांबण्यास मदत होते.
4. आल्याचे सेवन केल्यास तोंड येण्याच्या समस्या दूर होतात. आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असल्याने चावून खाल्ल्यास तोंड आणि पोटातील बॅक्टेरिया मारते. तसेच तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते.
5. आल्याच्या तुकड्याला साधे किंवा सैंधव मीठ लावून जेवणापूर्वी ते खाल्यास तोंडाची गेलेली चव परत येते.
6. आले व तुळशीचा काढा एकदम गुणकारी. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीवर हा काढा औषधी व रूचकर ठरतो.
7. आलं एक नैसर्गिक औषधी आहे. आल्यामुळे सांधेदुखी आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो. अद्रक वाटून त्यात थोडा कापूर टाकून त्याचा लेप तयार करावा, हा लेप सूजलेल्या आणि दुखत असल्याल्या ठिकाणी लावावा. काही वेळात तुम्हाला आराम मिळेल.
8. सतत खोकला येत असेल किंवा दम लागला असेल तर एक चमचा आल्याच्या रसात एक चमचा मध घालून सावकाश चाटण करावे आणि गरम पाणी प्यावे, खोकला थांबतो.
9. रक्तातील चरबीची पातळी कमी करण्यासाठी व रक्त पातळ करण्यासाठी आल्याचा उपयोग होता.
10. जर तुम्ही दररोज भाजीमध्ये किंवा सलाडमध्ये एक आल्याचा तुकडा खाल्ला तर वायरल आजारांपासून तुम्ही वाचू शकता. कारण आल्यामध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट्स तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवते.
Comment here
You must be logged in to post a comment.