मनोरंजन

….म्हणून सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, बाबा रामदेव यांचा धक्कादायक आरोप

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुशांत प्रकरणी सुरुवातीपासूनच वादाच्या घेऱ्यात सापडली आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्तीवर सुशांत प्रकरणी अनेक आरोप केले आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा वापर झाल्याचे समोर आल्याने एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशातच आता बाबा रामदेव यांनीही सुशांत प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

रामदेव बाबा यांनी मुलाखती दरम्यान आपली प्रतिक्रिया दिली. ही नशाखोर गँग आहे. हे ब्रँड नाही तर देशाला उद्ध्वस्त करत आहेत. यांना कोण आदर्श मानणार? यात कोण कोण आहेत, मला ठाऊक नाही. पण लवकरच ते समोर येईल, असं रामदेवबाबा म्हणाले.

सुशांत एक महत्त्वाकांक्षी तरूण होता, तो नशेच्या आहारी जाणारा तरूण नव्हता, तो आत्महत्या करूच शकत नाही. एक तर त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले गेले किंवा मग त्याची हत्या झाली, सुशांत शिस्तबद्ध आयुष्य जगत होता. त्याच्यासारखा तरूण कधीच आत्महत्या करणार नाही. हे एक खूप मोठे चक्रव्युह आहे. यात तरूण पिढीला फसवून उद्धवस्त केले जाते. एखाद्याची प्रगती होत असलेली पाहून त्याला व्यसनांच्या चक्रव्युहात ओढले जाते. आपल्याला देशाला अशा प्रवृत्तींपासून वाचवायला हवे, असे रामदेवबाबा म्हणाले, एनसीबी करत असलेल्या तपासावर त्यांनी समाधान व्यक्त केले. एनसीबी लवकरच ख-या गुन्हेगारांना शोधून काढेल याची आम्हाला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान, दीपिका पादुकोण आणि नम्रता शिरोडकर या सध्या अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या रडारवर आहेत. शनिवारी दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. आपण केव्हाच ड्रग्जच सेवन केलं नसल्याचं तिनही तारकांनी एनसीबीच्या चौकशी दरम्यान सांगितलं आहे.

Comment here