मनोरंजन

सुशांतची आत्महत्या की हत्या? एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे सोपवला अंतिम अहवाल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयाने सीबीआयला अहवाल सोपविला आहे. या अहवालाच्या आधारे याप्रकरणी आता सीबीआय पुढील तपास करणार आहे. तसेच, सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? यावरून सीबीआय निष्कर्ष काढणार आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, “एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहेत. सोमवारी यासंबंधी सविस्तर बैठक पार पडली”. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि गेल्या 40 दिवसांत सीबीआय तपासात आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. मात्र या चौकशीबाबात सीबीआयकडून कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या वतीने आता पहिल्यांदाच माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे.

सुशांत प्रकरणाचा तपास सर्व बाजूने करण्यात येत आहे. तसेच, सुशांतच्या मृत्यूची व्यावसायिक पद्धतीने चौकशी केली जात आहे. सर्व बाबींचा बारकाईने तपास केला जात आहे, असे सीबीआयने म्हटले आहे. याशिवाय, याप्रकरणी सुशांतचे कुटुंबीय आणि त्याची बहिणींची चौकशी सीबीआय करू शकते.

Comment here