मनोरंजन

दीपिका पदुकोण आणि दिया मिर्झानंतर ‘ही’ एक अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर, एनसीबीने बजावले समन्स

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये सध्या एनसीबी ड्रग्ज संबंधित गोष्टींची चौकशी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये बॉलीवूडमधील अनेक मोठ मोठ्या कलाकारांची नावे समोर येत होती. चौकशी दरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली. या यादीत आता टीव्ही अभिनेत्रीचंही नाव आलं आहे.

टीव्ही अभिनेत्री अबिगल पांडे आणि तिचा बॉयफ्रेंड सनम जोहर यांचं देखील नाव जोडलं गेलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांना एनसीबीने समन्स पाठवले आहे.

अबिगल आणि सनम यांची सुशांतसोबत खुप चांगली मैत्री होती. हे दोघंही अंमली पदार्थांच सेवन करतात असा संशय एनसीबीला आहे. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. दरम्यान सुशांत प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का? याची चौकशी देखील केली जाणार आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास बॉलिवुडच्या काही बड्या कलाकारांसाठी अडचण ठरणार आहे. कारण एनसीबी बॉलिवुडमधील त्या सर्व सेलिब्रिटीजला चौकशीसाठी बोलावणार आहे, ज्यांची नावं रियाने तपास यंत्रणेला दिली आहेत. एनसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या एक ते दोन आठवड्यात काही मोठ्या अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलवलं जाईल ज्यामध्ये सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, डिझायनर सीमेन खमबाटा यांची नावं आहेत.

दरम्यान, मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकल्यानंतर एनसीबीने 6 जणांना अटक केली. या सहा जणांचे बॉलिवूडमधील अनेकांशी संबंध असल्याचे सांगितले जात आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित या ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शाविक चक्रवर्ती मुख्य आरोपी आहेत. दोघांनी सुशांत सिंह राजपूत यांच्यासाठी ड्रग्स खरेदी केल्याची कबुली दिली आहे.

Comment here