मनोरंजन

सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या, तपास यंत्रणांवर भडकले शेखर सुमन

सुशांतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचेच प्रकरण असल्याचे एम्सच्या विशेष पथकाने म्हटले आहे. एम्सने आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्त केला आहे. या अहवालानंतर अनेकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. याच्या पाठोपो 7 ऑक्टोबर रोजी रियाला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. या गोष्टींमुळे सुशांत प्रकरणाची दिशाच बदलली. यातच अभिनेता शेखर सुमन यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

‘सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या केली गेली. श्वास गुदमरला की, असेच फिक्स केले,’ असं ट्विट शेखर सुमन यांनी केले आहे. शेखर सुमन यांच्या ट्विटवरून त्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं समजतंय. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जामीन मिळाल्यानंतरही शेखर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

शेखर सुमननं यापूर्वीही सुशांत प्रकरणावर अनेकवेळा वेगवेगळे दावे केले होते. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा दावा शेखर सुमननं यापूर्वीही केला होता.

सुशातं सिंह राजपूत प्रकरणी तपास यंत्रणाच्या रडारवर असणाऱ्या रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. रियाची 1 लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. कोर्टाने शोविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शोविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.

Comment here