मनोरंजन

अभिनेता सुबोध भावेला कोरोनाचं निदान, मुलगा, पत्नीही कोविड पॉझिटिव्ह

अभिनेता सुबोध भावे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सुबोध भावे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सुबोध भावेंसह कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तिघांनी स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

“मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया.” असं ट्विट करुन सुबोधने करोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

 

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये सुबोध भावे सोशल मीडियावर लहान मुलांसाठी कथा-गोष्टी ऑनलाइन स्वरुपात सांगत आहे. या कथा फार कमी वेळेतच लहान मुलांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत.

कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

Comment here